सातारा
जिल्हा कोरोनाने कहर केला आहे. मृत्युदर वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. साता रयात बाधितांची संख्या वाढल्याने भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील मोती चौक परिसरात हृदयविकाराच्या धक्क्याने एका वृद्धाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. चालत असतानाच हे वृद्ध अचानक कोसळले. त्यावेळी नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वृद्धाचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान या वृद्धाचे रात्री उशिरापर्यंत नाव समजू शकले नाही.
याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोती चौक येथील दर्शन कापड दुकाना समोरून 60 ते 65 वर्षीय एक वृद्ध इसम रस्त्यावरून चालत जात असताना चक्कर येऊन खाली पडला. घटनास्थळी बघ्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. याबाबतची माहिती मिळतात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल वायकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ वृद्ध इसमाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
सातारा जिल्हा रुग्णालयात त्या मृत्युपश्चात वृद्धाची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.








