अखेर एसएसएलसी परीक्षा पार
प्रतिनिधी / बेळगाव
विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारी एसएसएलसी परीक्षा अखेर पार पडली. गुरुवारी सकाळी 10.30 ते 1.30 यावेळेत तीन पेपर झाले. आणि विद्यार्थ्यांनी ‘एकदाचे सुटलो।़।़’ अशा अर्थाने ‘हुश्श।़।़’ केले. विद्यार्थ्यांइतकाच पालकांनाही ही परीक्षा पार पडल्याचा आनंद झाला.
गेले वर्षभर ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेऊन विद्यार्थी वैतागले होते. कोरोनाच्या छायेखाली झालेली ही परीक्षा एका अर्थाने विद्यार्थ्यांसाठी नेहमीच्या परीक्षेपेक्षा सोपी ठरली. ही परीक्षा शिक्षण खात्यासमोरही मोठे आव्हान निर्माण करणारी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मार्गदर्शनसूची ठरवून दिली होती. त्यामुळे एका वर्गात बारा विद्यार्थी इतकी मर्यादित संख्या
होती.
सोमवारी तीन पेपर झाले होते व गुरुवारी मराठी, इंग्रजी व कन्नड असे भाषा विषयाचे पेपर झाले. मंगळवारी व बुधवारी शिक्षण खात्यातर्फे परीक्षा केंद्रांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबरच आता शिक्षण खात्याला निकालाची प्रतीक्षा लागली
आहे.









