अचूक बातमी “तरूण भारत”ची, शुक्रवार 4 मार्च 2022, सकाळी 11.30
● जिल्ह्यात जनजीवन पुन्हा रूळावर
● सातारा, कराडही सावरले
● 24 तासात 24 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा धसका कमी झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला पुुन्हा एकदा रूग्णवाढीचे आकडे घसरले असून शुक्रवारी आलेल्या अहवालात सातही तालुक्यात एक अंकी रूग्णवाढ झाली आहे. विशेष म्हणजे सातारा आणि कराड तालुके सुद्धा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 987 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 24 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 2.43 आहे.
सातारा 2 तर फलटण, कराड 6
जिल्ह्यात गेल्या 24 तासात आलेल्या अहवालात कराड तालुक्यात 6 रूग्ण वाढले आहेत. खंडाळा तालुक्यात 2, कोरेगाव तालुक्यात 2, पाटण तालुक्यात 1, फलटण तालुक्यात 6, सातारा तालुक्यात 2, वाई तालुक्यात 3 रूग्ण वाढले आहेत. इतर जिल्ह्यातील2 असे 24 रूग्ण वाढले आहेत.
पाच तालुक्यात एकही रूग्ण नाही
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सात तालुक्यात एक अंकी रूग्णवाढ झाली असून उर्वरीत पाच तालुक्यात एकही नवा रूग्ण वाढलेला नाही. पाटण, खटाव, माण,महाबळेश्वर, जावली या तालुक्यात एकही नवा रूग्ण नाही. त्यातही महाबळेश्वर, पाटण, जावली तालुक्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अपवाद वगळता नव्या रूग्णांची भर पडलेली नाही.
शुक्रवारी
नमुने-987
बाधित-24
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,53,546
बाधित-2,79,041
मृत्यू-6675
मुक्त-271528









