मॉन्स्टर डॉटकॉमची माहिती : फेब्रुवारीत भरतीत सुधारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्षाच्या आधारावर पाहता फेब्रुवारीमध्ये हुशार उमेदवारांच्या मागणीमध्ये एकंदर 7 टक्के इतकी वाढ दिसली आहे. मॉन्स्टर डॉटकाम यांनी या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे.
गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये भरती प्रक्रियेमध्ये वाढ होत असून फेबुवारीत एकंदर भरतीत 3 टक्के इतकी वाढ दिसली आहे. महिन्याच्या तुलनेमध्ये पाहता 3 टक्के इतकी भरतीमध्ये वाढ झाली आहे. शिपिंग, मरीन तसेच उत्पादन क्षेत्रात पूर्वपरिस्थिती परतली असून याच क्षेत्रात 9 टक्के इतकी भारतीत वाढ झालीय. पीएलआय योजनेचा विस्तार, प्रधानमंत्री गती शक्ती मास्टर प्लॅनची योजना या साऱया बाबी नोकर भरतीत वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. ऑटोमेशन, बँकिंग आणि वित्त सेवा, पिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रात 23 ते 27 टक्के इतकी भरती वाढली आहे. शिपिंग, मरीन आणि टेलिकॉम क्षेत्रामध्ये 19 टक्के वाढीव भरती दिसली आहे. आयटी आणि बीपीओ क्षेत्रांनी वार्षिक तत्त्वावर नोकरभरतीमध्ये अनुक्रमे 18, 17 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे.
नोकर भरतीत झाल्या सुधारणा- नोकरी डॉटकॉमचा अहवाल

गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबुती प्राप्त होताना दिसते आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नोकर भरतीमध्ये साधारण 31 टक्क्यांची वाढ दिसली आहे. रोजगाराशी संबंधित नोकरी डॉट कॉम यांनी या संदर्भातली एक पाहणी नुकतीच केली होती. या पाहणीसंदर्भातला अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून फेब्रुवारी महिन्यामध्ये नोकरभरतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मोटर वाहन उद्योग आणि याशी संबंधित क्षेत्रांमध्ये दीर्घ काळानंतर सुधारणा दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे इतर संघटित क्षेत्रामध्ये वृद्धीचा कलही कायम राहिला आहे. याआधारे पाहता नोकरीमध्ये वाढ चांगली दिसली आहे.
विमा क्षेत्रात वृद्धी
विमा क्षेत्रामध्ये फेब्रुवारी 2021 च्या तुलनेमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये 74 टक्के इतकी वाढ भरतीमध्ये दिसून आली आहे. दीर्घकाळापासून सुस्तीचा माहोल असणाऱया मोटर वाहन उद्योगामध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये नोकर भरतीत वाढ दिसली आहे.









