वार्ताहर/ हुबळी
सरकारच्या नियमानुसार अनुमती न घेता शाळा सुरू केलेल्या हुबळीतील काही खासगी शाळांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. शहरातील लोहिया नगरमधील रेणुका एज्युकेशन ट्रस्टचे रेणुका प्राथमिक शाळा आणि कारवार रस्त्यावरील अप्पा एज्युकेशन सोसायटीची अप्पा प्राथमिक शाळांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी दिला आहे. सदर शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना 2020-21 सालासाठी जवळील सरकारी, अनुदानित किवा विनाअनुदानित शाळेत दाखल करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी शैलजा कट्टी यांनी केली









