हुपरी / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने खासदार धैर्यशील माने यांनी हुपरी येथे तातडीची आढावा बैठक घेतली.
यावेळी खासदार माने यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई व संबधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन कोवीड केअर सेंटर, स्वॅब संकलन केंद्र हुपरीत उभे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. यासाठी नगरपालीकेला शाळा बघून त्या ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच लागणारे डॉक्टर्स व इतर स्टाफसाठी खासगी डॉक्टर, आशा वर्कर यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
दरम्यान, हुपरी शहरात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांनी नगरपालिकेच्या वतीने आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील(यड्रावकर),पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई व आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे हुपरीत स्वतंत्र कोवीड केअर सेंटर स्वॅब संकलन केंद्र व्हावे, अशी लेखी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून खासदार माने यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी हुपरीतील संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी वाहणांची व्यवस्था करणे,कॅंटोन्मेंट झोनवर पोलीस बंदोबस्त ठेवणे. यासाठी होमगार्ड वाढविण्यास जिल्हा पोलीस प्रमुख व आरोग्य केंद्रात स्टाफ वाढविण्यासाठी आरोग्य वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत फोनवरून बोलून निर्णय घेतला गेला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा यांचे वतीने हुपरीमध्ये ग्रामिण रुग्णालय व्हावे याबाबतचे निवेदन खासदार माने यांना देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट,मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार -ढेरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








