पुसेसावळी / वार्ताहर
हुतात्म्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे त्याच्या विचाराचा वारसा पुढे चालण्यासाठी या हुतात्मा दिनास उत्सवाचे स्वरुप दयावे. तसेच या हुतात्म्यांच्या स्मुर्ती जागविण्याचे काम देखील व्हावे असे मत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले. वडगाव (ज.स्वा) ता. खटाव येथे हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, हुतात्म्यांची पावनभूमी असलेल्या वडगाव मध्ये दरवर्षी ९ सप्टेंबर ला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने कार्यक्रम घेतला जातो. कोरोनाच्या पाश्वभुमीवर गणपती उत्सव येत आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेऊन उत्सव साजरा करावा. त्याचबरोबर रखडलेल्या विकास कामांना चालना दिली जाईल. आणि पाणी प्रश्नासाठी पुढाकर घेऊन राहिलेली उरमोडीची कामे मार्गी लावली जातील असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, बंडा गोडसे, सुनिल माने आदिंची भाषणे झाली. याआधी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सुनिल माने, प्रदिप विधाते ,मानसिंग जगदाळे,कल्पना खाडे, सुरेंद्र गुदगे, शिवाजीराव सर्वगोड, संतोष घार्गे, संदिप मांडवे, जितेंद्र पवार, जयश्री कदम, रेखा घार्गे, चंद्रकांत पाटील, अर्जुनराव खाडे, प्रकाश घार्गे, प्रांताधिकारी जनार्दन कासार, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार किरण जमदाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर पुसेसावळी परिसरातील सरपंच, चेअरमन, सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, गोवामुक्ती स्वातंत्र सैनिक संघटना व वडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









