जायंट्स ग्रुप मेन, जायंट्स सखी महिला मंडळातर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
हुतात्मा चौक बेळगाव येथे दि. 9 रोजी ऑगस्ट क्रांतीदिन साजरा करण्यात आला. जायंट्स ग्रुप मेन, जायंट्स सखी महिला मंडळ यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यसैनिक व उत्तराधिकारी संघ, सिद्धार्थ फ्री बोर्डींग-शहापूर, बेळगाव मार्ग यांच्यातर्फे हा कार्यक्रम हुतात्मा चौक येथे झाला.
अध्यक्षस्थानी हुतात्मा चौक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष दिलीप सोहनी होते. प्रारंभी राजेंद्र कलघटगी यांनी नामफलकाला तर परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव व बेळगावचे हुतात्मा बाबू काकेरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गीता पाटील, पवित्रा हिरेमठ, ज्योती अनगोळकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यानंतर ऍड. अशोक पोतदार व नीता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी दिलीप सोहनी यांचा तसेच पवित्रा हिरेमठ यांचा ऍड. अशोक पोतदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले व क्रांतीदिनाबद्दल माहिती दिली. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी जायंट्स ग्रुप व सहकारी संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजेंद्र कलघटगी यांनी आभार मानले.









