म. ए. युवा समितीच्या बैठकीत निर्धार : विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
कन्नडसक्ती विरोधातील 1986 च्या आंदोलनात अनेक सीमावासियांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचे बलिदान सीमाप्रश्नाला प्रेरणादायी ठरते. या हुतात्म्यांना बुधवार दि. 1 जून रोजी सकाळी 8.30 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून सीमा लढय़ात सक्रिय होणे प्रत्येक युवकाचे कर्तव्य असून, शेवटचा भिमटोला देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन म. ए. युवा समितीच्यावतीने करण्यात आले.
युवा समितीतर्फे रविवारी सायंकाळी टिळकवाडी येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. म. ए. समितीच्यावतीने मराठीत कागदपत्रे द्यावीत यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले जाणार असून, यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. जयंत पाटील यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, समर्थ पाटील, हेमंत पाटील, सिद्धार्थ चौगुले, प्रथमेश मण्णूरकर, अजित जुवेकर, महेश मण्णूरकर, ज्ञानेश्वर मण्णूरकर, प्रकाश हेब्बाजी, प्रकाश नेसरकर, सुधीर शिरोळे, आकाश भेकणे, निखील देसाई यांच्यासह
मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









