बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी सांगितले की, राज्य सरकार हुक्का बारवरील बंदीबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. हुक्का बार एक गंभीर बाब आहे. बेंगळूर आणि म्हैसूरसारख्या शहरात काही रेस्टॉरंटमध्ये स्वतंत्र हुक्का बार आहेत, असे बोम्माई म्हणाले.
विधानसभेत कॉंग्रेस सदस्या सौम्या रेड्डी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोम्माई यांनी बृह बेंगळूर महानगर पालीके (बीबीएमपी) सारख्या स्थानिक संस्था त्यांना परवाना देतात, आम्ही त्यांच्यावर छापे टाकत आहोत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, यापूर्वीच यावर्षी एकट्या बेंगळूरमध्ये ७० हून अधिक गुन्हे दाखल करण्या आहेत.
ही कारवाई समाधानकारक नाही. युवक हुक्का बारकडे आकर्षित होत आहेत. मी इतर राज्यांतील कारवाई किंवा हुक्का बारवरील बंदीबाबत अभ्यास करण्यास सांगितले आहे. आम्ही हुक्का बारांवर बंदी घालण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहोत. राज्य सरकार आवश्यकव ते कायदे करेल असे म्हणाले, दरम्यान यासाठी बीबीएमपी आणि परवानाधारक प्राधिकरण असलेल्या इतर स्थानिक संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे.
हा मुद्दा उपस्थित करीत सौम्या रेड्डी यांनी अद्याप हुक्का बार आणि कॅफेमध्ये ड्रग उपलब्ध आहेत. त्यामुळे ड्रगवर सतत कारवाई करण्याची मागणी केली. (पीटीआय)