ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
देश चालवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मात्र, कोरोना काळात माझे प्रयत्न आणि इमानदारी माझ्या लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी पुरेसी ठरली नाही, असे सांगत उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी जनतेची माफी मागितली. यावेळी भावूक झालेल्या किम जोंग यांच्या डोळ्यात पाणी आले.
कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला किम जोंग यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना ते भावूक झाले. कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या आव्हानात्मक स्थितीची त्यांनी देशवासियांना माहिती दिली. त्यावेळी जनतेच्या अपेक्षांप्रमाणे मी काम करु शकलो नाही, त्यासाठी मी जनतेची माफी मागतो, असे म्हणत भाषण सुरु असतानाच किम जोंग यांनी आपला चष्मा काढून डोळे पुसले.
पूर्वजांची आठवण काढत ते म्हणाले, देशाचे नेतृत्व करण्याची माझी जबाबदारी ही किम इल-सुंग आणि किम जोंग-इल यांसारख्या महान काॅम्रेडच्या वारसाशी जोडलेली होती. मात्र, प्रयत्न आणि प्रमाणिकपणाच्या अभावामुळे मी लोकांचे दु:ख दूर करू शकलो नाही, याची खंत वाटते.