बेळगाव
खादरवाडी (ता. बेळगाव) येथील धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
अमदान मोहम्मदखासीम शेख (वय 17, रा. भारतनगर, हुंचेनट्टी) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अमदान हा पाहुण्यांकडे गेला होता. दुपारी धरणाकडे गेला असता पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.









