प्रतिनिधी/इस्लामपूर
देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे केला.
त्यांनी पुढे म्हटले आहे, स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन सुरुवाती पासून केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना पूर्ण ताकदीने या संकटाचा मुकाबला करत आहेत. महाराष्ट्राला ८५ लाख लसी मिळाल्या आहेत. मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १२.३० कोटी तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास ४. ७३ लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात ८० लाख लसी तिथे लोकसंख्या ६.५० कोटी आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास १७ हजार आहे. अशा परिस्थितीत सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








