नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी दुचाकीची निर्मिती करणारी हीरो मोटोकॉप कंपनीकडून नवीन एचएफ डीलक्स मॉडेल दाखल केले आहे. ही दुचाकी कंपनीकडून नवीन नियमावलीप्रमाणे बीएस-6 या प्रणालीवर आधारीत सादर केली आहे. एचएफ डीलक्सची किमत 55,925 रुपये असल्याची माहिती कंपनीकडून दिली आहे. कंपनीने सादर केलेले नवीन मॉडेल दोन वेगवेगळय़ा मॉडेलमध्ये दाखल केले आहे. यामध्ये सेल्फ स्टार्ट एलॉय व्हील आणि सेल्फ स्टार्ट एलॉय व्हील आय3 एसमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. देशातील पहिली 100 सीसी क्षमता आणि बीएस-6 प्रणालीची दुचाकी असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. दिल्लीमधील एक्स शोरुममध्ये या दुचाकीची किंमत 55,925 रुपये आहे. तर सेल्फ स्टार्ट एलॉय व्हील असणारी आय3एस दुचाकीची किंमत 57,250 रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.








