तज्ञांचे मत : बचावासाठी खिडक्या उघडय़ा ठेवा, कार्यालये-शाळांमध्ये एअर फिल्टर अन् मास्क आवश्यक
थंडी वाढू लागताच लोक एकत्र येण्याचे प्रमाण वाढणार असल्याने कोरोनाच्या धोक्यातही अधिक भर पडणार असल्याचे अमेरिकेतील संशोधकांचे म्हणणे आहे. हिवाळय़ात लोक घर, कार्यालय किंवा बंदिस्त ठिकाणी राहणे पसंत करतात. इनडोअर जागांमध्ये विषाणू फैलावण्याचा धोका अधिक आहे.
अमेरिकेच्या दाक्षिणात्य प्रांतांमध्ये उन्हाळय़ात लोक वातानुकुलित कार्यालये आणि घरांमध्ये अधिक एकत्र येऊ लागले होते. आता हाच कल हिवाळय़ातही दिसून येऊ शकतो. अशा स्थितीत बचावासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.
खराब व्हेंटिलेशनची ठिकाणे टाळणे
खराब व्हेंटिलेशन असलेल्या इनडोअर ठिकाणी विषाणूचा प्रभाव अधिक दूर आणि उशिरापर्यंत राहतो. कोरोनावर संशोधन करणाऱया अमेरिकन डॉक्टर मार यांच्यानुसार खराब व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी म्हणजेच बहुतांश रेस्टॉरंट आणि बारमध्ये धोका अधिक असतो. उन्हाळय़ात रुग्णालयांच्या आत बाधिताकडून विषाणू छोटय़ा ड्रॉपलेट्सच्या स्वरुपात (एअरोसोल्स) हवेत 16 फूटापर्यंत फैलावत होते. स्वतःचा चेहरा झाकणे आणि हात धुवत राहणे हाच अद्याप बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे डॉ. मार यांनी म्हटले आहे.
पाणी अन् साबणाचा वापर सर्वोत्तम उपाय
विषाणूचा इनडोअर फैलाव रोखण्यासाठी बाजारात विविध प्रकारची महागडी उपकरणे आहेत. ही उपकरणे पृष्ठभागाला साफ करण्याच्या आश्वासनासह हवेला विषाणूमुक्त करण्याचा दावाही करतात. परंतु अशी बहुतांश उपकरणे ओव्हरकिल आणि हानिकारक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या फॅन्सी दिसणाऱया गोष्टींकडे दुर्लक्ष केले जावे. पाणी आणि साबण आजही सर्वात सुंदर आणि उत्तम पद्धतीने काम करतात असे उद्गार कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमधील ऍटमॉसफियर केमिस्ट डेलफिन फार्मर यांनी काढले आहेत.
मोठय़ा इमारतींमध्ये कसा बचाव करणार..
केवळ व्हेंटिलेशन ठीक करून संसर्ग रोखता येणार नाही. काही सामूहिक प्रयत्नांच्या बळावर याचा धोका कमी करता येऊ शकतो, असे हार्वर्ड विद्यापीठातील बिल्डिंग सेफ्टीचे तज्ञ जोसेफ एलेन यांनी म्हटले आहे.
? शक्य तितकी गर्दी टाळावी. वर्क फ्रॉम होमसाठी प्रोत्साहन दिले जावे.
?केवळ परवानायुक्त प्रवेश दिला जावा. इमारतीत प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असलेल्यांनाच मंजुरी.
?इमारतीत एअर फिल्टर बसवून घ्यावा आणि पृष्ठभाग सातत्याने सॅनिटाइज करत रहावा.
?लिफ्टमध्ये किती लोक जातील हे निश्चित करण्यात यावे.
?इनडोअरमध्ये फेस कव्हरिंग आणि अन्य वैयक्तिक सुरक्षात्मक उपकरणांचा वापर करावा.
?बंदिस्त ठिकाणी मास्कचा वापर करण्यात यावा.
सलाइवा चाचणी ठरणार उपयुक्त

स्वतः घेण्यात आलेल्या सलाइवाच्या नमुन्यांमुळे कोरोना विषाणूच्या लक्षणविरहित रुग्णांची जलद आणि मोठय़ा प्रमाणावर चाचणी करण्यास मदत मिळत असल्याचे एका अध्ययनात दिसून आले आहे. क्लीनिकल इन्फेक्शियस डिसिज या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात हा मुद्दा मांडण्यात आला आहे.
जपानमध्ये सुमारे 2000 लोकांचे नासॉफिरिन्जियल स्वॅब आणि सलाइवाचे नमुने घेण्यात आले, या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. यानंतर या नमुन्यांची चाचणी आणि तुलना करण्यात आली आहे. समुदाय आणि रुग्णालयांमध्ये कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी लक्षणरहित बाधितांना लवकर ओळखणे गरजेचे असल्याचे जपानच्या होकाइदो विद्यापीठाचे टेकानोरी तेशिमा यांनी म्हटले आहे.
बहुतांश नमुन्यांची दोन वेगवेगळय़ा पद्धतीने चाचणी करण्यात आली. पहिली कोरोनाचा सर्वात अचूक पत्ता लावणारी पीसीआर टेस्ट आणि दुसरी सर्वसाधारणपणे अत्यंत वेगाने विषाणूचा शोध लावणारी आरटी-एलएएमपी चाचणी करण्यात आली. परंतु दोन्हींदरम्यान निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रकरणांच्या संख्येत मोठे अंतर नाही. नासॉफिरिन्जियल स्वॅबने करण्यात आलेल्या चाचणीत 77-93 टक्के संक्रमणाचा शोध लागला. तर सलाइवाच्या चाचणीत 83-97 टक्के संक्रमणाचा शोध लागला आहे.
सलाइवाची चाचणी नासॉफिरिन्ज्यिल स्वॅब चाचणीपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे तेशिमा यांनी म्हटले आहे. सलाइवाचा स्वतःचा घेतलेला नमुना व्यक्तीसाठी वेदनारहित आहे. तसेच हा दुसऱया लोकांशी होणारा संपर्क टाळतो, यातून विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका कमी होत असल्याचे तेशिमा यांनी नमूद केले आहे.









