मोहरीच्या तेलामध्ये विविध गुणधर्म असतात.फकत त्वचा आणि केसांवरच नाही तर अनेक समस्यांवर हे तेल प्रभावी ठरते. हिवाळ्यात या तेलाचा वापर केला जातो. आज आपण या तेलाचे आणखी कोणते फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने संपूर्ण शरीरात ब्लडसर्क्युलेशन सुधारते. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. अशावेळी मोहरीचे तेल दातांना लावल्यास ती समस्या कमी होऊ शकते.
मोहरीच्या तेलात ओलिक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड असते. केसांच्या वाढीसाठी ते खूप उपयुक्त आहेत. यामुळे केसांचे पोषण होते तसेच केसगळती थांबते.
हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. या काळात संधिवात वेदना देखील वाढू शकतात. अशावेळी मोहरीच्या तेलाच्या मसाज केल्यास वेदना कमी होऊ शकतात.
मोहरीचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात ज्यांची त्वचा कोरडी पडते त्यांनी या तेलाची मालिश करावी. त्यामुळे समस्या कमी होईल.
(आरोग्यविषयक कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









