पणजी/ प्रतिनिधी
गोवा राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 जानेवारी रोजी सुरू होत असून ते 19 जानेवारीपर्यंत चालेल. हे 2023 या वर्षातले पहिले अधिवेशन असल्याने राज्यपाल पी. एस. श्ऱीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके चर्चेला येणार असून पुरवणी अर्थसंकल्पीय मागण्यांना देखील मंजुरी घेण्यात येणार आहे.