जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन बेळगावात आयोजित करण्याची घोषणा केली आहे. दि. 12 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होण्याची शक्मयता असल्याने महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, लॉज व विविध मंगल कार्यालये राखीव ठेवण्यासाठी गुरुवार दि. 3 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनाच्या तयारीसाठी महापालिकेने यापूर्वी हॉटेल चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक घेऊन दि. 10 डिसेंबरपासून हॉटेल, लॉज व मंगल कार्यालये अधिवेशनासाठी राखीव ठेवण्याची सूचना केली होती. याबाबत पुढील नियोजन करण्यासाठी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी येणाऱया मंत्रिमहोदय, आमदार आणि अधिकाऱयांना राहण्यासाठी खोल्या राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने माहिती घेऊन सूचना करण्याच्या दृष्टीने बैठक घेतली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त विविध सूचना करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









