बेंगळूर
इलेक्ट्रिक दुचाकीच्या क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत असलेल्या हिरो इलेक्ट्रिकलला सध्या अच्छे दिन आले आहेत. त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना ग्राहकांकडून चांगली मागणी होताना दिसते आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात कंपनीने 7 हजारहून अधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली असल्याची माहिती आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात कंपनीने निव्वळ 1 हजार 169 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती. इलेक्ट्रिक वाहनांप्रती सरकारचे नवे धोरण लक्षात घेत ग्राहकही आता इलेक्ट्रिक दुचाकी घेण्यावर भर देत आहेत.









