वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी गाडय़ांची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हिरोमोटो कॉर्पला चौथ्या तिमाहीमध्ये मजबूत नफा कमाई झाल्याची नेंद केली आहे. 2021 मधील जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीला जवळपास 865 कोटी रुपयाचा नफा झाला आहे. महसूल प्राप्ती ही 8,686 कोटी रुपयांची झाली होती. नफा आणि महसूल दोन्ही मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती आहे.
10 कोटी दुचाकी उत्पादन
कंपनीने मोठी घोषणा करताना, आर्थिक वर्षासाठी प्रति समभाग 25 रुपये अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला आहे. स्पेशल डिव्हिडेंडच्या पातळीवर प्रति समभाग 10 रुपये केला आहे. याचदरम्यान कंपनीने दुचाकीचे एकूण उत्पादन 10 कोटींवर केल्यामुळे यातून एक माईलस्टोन गाठण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.
मोटरसायकल आणि स्कूटर सेगमेंट
हिरोमोटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांनी यावेळी म्हटले आहे,की स्कूटर आणि मोटरसायकल सेगमेंटमधील कंपनीचे बाजारमूल्य वाढले आहे. याच्या व्यतिरिक्त सध्या प्रीमियम सेगमेंटमध्येही मजबूत स्थिती प्राप्त करणार असल्याचे नमूद केले आहे.
वाहन क्षेत्रात सकारात्मक वातावरण
कंपनीचे मुख्य फायनान्शिअल अधिकारी (सीएफओ) निरंजन गुप्ता यांनी मान्सूनच्या सकारात्मक कामगिरीनंतर वाहन क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









