नवी दिल्ली
कट आणि पॉलिशड हिरे तसेच मूल्यवान खडय़ावरील आयात शुल्क आता कमी करून 5 टक्के इतकी केले आहे. याआधी हे शुल्क 7.6 टक्के इतके आकारले जात होते. अर्थमंत्र्यांनी याबाबत शुल्क कमी केल्याने भविष्यात हिरे व हिऱयाचे दागिने स्वस्त होणार आहेत. यासंबंधीत उद्योगाला शुल्कात कपात करत दिलासा देण्यात आलेला आहे. रत्ने आणि दागिनेसंबंधीत अखिल भारतीय परिषदेचे चेअरमन आशिष पेठे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हिऱयाशी संबंधीत उद्योगांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









