बेळगाव/ प्रतिनिधी
हिरेबागेवाडीता. बेळगाव ) येथील एका 45 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी दुपारी राज्य आरोग्य व कुटंब कल्याण खात्याने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहोचली आहे.
शनिवारी राज्यात 12 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 371 पोहोचली आहे. हिरेबागोवाडी येथील रूग्ण क्रंमाक 228 च्या संपर्कातून या 45 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी बेळगाव शहरातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शनिवारच्या अहवालातही हिरेबागोवाडी येथील रुग्णाचा समावेश आहे.









