नावरांचे महत्त्वाचे पशुखाद्य म्हणजे हिरवा चारा. हिरवा चार हंगामी, द्विहंगामी, वार्षिक किंवा बहुवार्षिक असतो. चारा पिकासही इतर पिकांप्रमाणेच काळजीपूर्वक विशेष मशागत करून लागवड व योग्य कृषी तंत्र वापरून व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे अशा पद्धतीने उत्पादित केलेल्या चाऱयाची किंमत गायराने व कुरणे या पद्धतील चारा उत्पादन पद्धतीपेक्षा जास्त असते. तरीसुद्धा सर्वसाधारणपणे सकस व पोषण मूल्यसंपन्न पद्धतीने तयार केलेला चारा, खुराकाच्या प्रमाणात बराच स्वस्त पडतो. दुभत्या जनावरांच्या आहारात अशा सकस चाऱयाच्या समावेशाने खुराकाचे प्रमाण व त्यावरील खर्च कमी होऊ शकतो. व दुग्धउत्पादन खर्च आपोआप कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढते. हिरवा चारा दोन प्रकारचा असतो एकदल अथवा तृणवर्गीय व द्विदल अथवा डाळ वर्गीय, एकदल चाऱयात मका, ज्वारी, बाजरी, ओट (सातू), संकरीत नेपियर, गिनी गवत, पॅरा गवत, सुदान गवत, ब्लू पॅनिक, सिटेरिया, ऊस, अंजन गवत इत्यादी स्थानिक व परदेशी गवताचा समावेश होतो.
हिरव्या चाऱयाचे जनावरांच्या आहारातील महत्त्व
- हिरवा चारा जनावरे आवडीने खातात, त्यामुळे चारा वाया जात नाही.
- डाळवर्गीय हिरव्या चाऱयातून उदा ः लुसर्न, बरसीम यातून खनिजांचा व प्रथिनांचा पुरवठा शरीरास होतो.
- हिरवा चारा रुचकर, लुसलुशीत, रसदार असल्यामुळे पौष्टिक असतो. त्यामुळे जनावरांची भूक भागविण्यासाठी मदत करतो .
- चाऱयातून जीवनसत्व ‘अ’ म्हणजेच कॅरोटीनचा पुरवठा होऊन रातांधळेपणा, डोळय़ातून पाणी जाने इ. विकार टळून जनावरांचे डोळे सतेज बनतात .
- हिरवा चारा पचण्यास सोपा असतो, त्यामुळे जनावरांना मलावरोधाचा त्रास होत नाही आणि लवकर पचन होते.
- हिरव्या चाऱयातील अशोधीत ‘वाढ घटक’ जनावरांच्या वाढीस पोषक ठरतात.
- गाभण जनावरांच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, अथवा अन्य शारीरिक अपंगत्व असलेली असू शकतात.
- जनावरांचे किमान 10 टे 12 लिटर दूध केवळ संतुलित हिरवा चारा देऊन टिकवता येऊ शकतो.
- एकदल-द्विदल चाऱयाचे मिश्रपीक
एकदल व द्विदल चाऱयाचे मिश्रपीक एकमेकांस पूरक असल्याने त्याचे पीक घ्यावे. त्यापासून मिळणारे फायदे
- एकदल आणि द्विदल चाऱयाच्या मिश्र पिकांपासून कुठल्याही एका पिकापेक्षा जास्त उत्पन्न मिळते.
- द्विदल पिके एकदल पिकांना (नत्र) पुरवितात.
- गवतामुळे द्विदल पिकांना थंडीपासून संरक्षण मिळते.
- मिश्रपिकांमुळे तणे कमी होते.
- मिश्र गवतामुळे जनावरे फुगण्याचे प्रमाण कमी होते. कारण चरताना ती दोन्ही प्रकारचा चारा खातात.
- चारा पिकांचे महत्त्व
- चारा पिकांचा कालावधी कमी असल्यामुळे आंतरपिकांसाठी योग्य पीक आहे.
- चार पिकाच्या दाट लागवडीमुळे ती जमीन झाकून टाकतात. त्यामुळे ताणे वाढू देत नाहीत. व मृद संधारण करतात.
- जास्त काळ टिकण्याचा गुणधर्म व पुन्हापुन्हा होणारी फूट यामुळे वारंवार पेरणी करावी लागत नाही, वां जमिनीची पूर्वमशागत वारंवार करावी लागत नाही.
- चारापिकाची प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता जास्त असते.
- जास्तीच्या कापण्या देण्याच्या गुणधर्मामुळे नियमित उत्पन्न व मजुरांना रोजगार मिळतो.
- चारा पिकांपासून बियांणे कमी मिळते. तसेच बीज गुण-गुणोत्तरही कमी आहे.
बहु कापण्यात येणाऱया पिकांच्या मशागतीचा खर्च कमी येतो. किंवा वार्षिक चारापिकांचा खर्च कमी येतो.
चारापीक मशागतीचे व्यवस्थापन
- चारापिकाचा उदेशाप्रमाणे(वाळलेला चारा, ताजा चारा इ.) बियाण्याचा दर आणि चारापिकांतील अंतर ठरवावे. उदा : वाळविण्याचा चारा पिकवायचा असेल तेव्हा किंवा शेतात फार तन होत असेल तेव्हा जास्तीचे बियाणे वापरावे.
- अति पावसामुळे जमीन ओली असल्यामुळे पेरणी करणे अवघड जाते. अशावेळी बहुकापन्या देणाऱया पिकांच्या जातींची उन्हाळय़ातच पेरणी करावी. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा व पावसाळाभर हिरवा चाऱयाचा पुरवठा होईल.
- रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी वापरायची रसायने पीक कापण्याच्या आधी फवारू नयेत. जर औषधे फवारण्याची वेळ आलीच तर औषध फवारणीनंतर चारा कमीत कमी तीन आठवडे तरी चारण्यासाठी वापरू नये. म्हणजे जनावरांना विषबाधा होणार नाही.
- चारापिके फुलावर असताना
टे चीकावर असेपर्यंत कापावीत, म्हणजे ताजा भरपूर
अन्नद्रव्य असलेला पौष्टिक चारा उपलब्ध
होतो. - बहु कापण्या देणारी चारापिके जमिनीपासून 8-10 से. मी. वर कापावी म्हणजे नवीन फूट चांगली होऊन खोद्योद्व्यापासूनही चांगले उत्पन्न मिळते.
वर्षभर हिरवा चारा पुरविण्याचे नियोजन
वर्षभर हिरवा चारा पुरवण्याचे नियोजन म्हणजे फक्त जस्त उत्पादन देणाऱया चारा पिकाचे उत्पादन नसून रसदार चविष्ट चारा आणि वाळलेला चारा, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ संपन्न चारा. उत्तम कडबा आणि मुरघास करण्यायोग्य चारा होय. वर्षभराच्या चारा पुरविण्याचे नियोजन करताना चाऱयाचे सर्व साधारण उत्पादन, चारा पिकांसाठी जमिनीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कारण अंदाजापेक्षा कमी उत्पादन झाल्यास चारा कमी पडतो किंवा अंदाजापेक्षा जास्तीचा चारा पिकल्यास तो वाया जातो म्हणून अंदाजापेक्षा ज्यादा उत्पादन ध्यानात घेऊन तसे नियोजन करावे.
चारा कमी पडू नये म्हणून चाऱयाची पूर्तता करण्यासाठी चाऱयाचा राखीव साठा ठेवावा. जसे वाळलेला चारा कुट्टी करून किवा हिरवा चारा मुरघास करून, गरजेनुसार हा चारा त्वरित वापरता येतो.
अशा प्रकारच्या गवताचा साठा दुष्काळी प्रदेशासाठी वरदान ठरतो. कारण पावसावरील शेतीमुळे चारा पुरवठय़ामध्ये कमी जास्त होतो. त्यामुळे कधी दुष्काळ तर कधी सुकाळ अशी परिस्थिती होते.
डॉ. डी. व्ही कोळेकर, बेंगळूर