ऑनलाईन टीम / शिमला :
जानेवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 5 जानेवारीपासून कोणत्याही कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत पोलीस मुख्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, जानेवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी पोलिसांना डबल ड्युटी करण्यासाठी उपलब्ध राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यापूर्वीच जर कोणी 5 जानेवारी नंतर सुट्टी घेतली असेल तर त्या सुट्ट्या रद्द करून त्यांना पुन्हा कामावर हजर राहावे लागणार आहे.









