ऑनलाईन टीम / सिरमौर :
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील डॉ. वायएस परमार मेडिकल कॉलेज नाहक मधील एक महिला चिकित्सक चंदीगडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळली. या महिला चिकित्सक सामुदायिक चिकित्सा विभागातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या घरी चंदीगड मध्ये गेली होती. या महिला डॉक्टरचा पती चंदीगडमधील 32 सेक्टर मेडिकल कॉलेजमध्ये हृदय रोग विशेषतज्ञ आहे.
नाहक मेडिकल कॉलेज चे प्रधनाचार्य डॉ. एन के मेहेंद्रू यांनी सांगितले की, संबधित महिला चिकित्सक या सुट्टीवर होत्या. आणि त्या चंदीगड मध्ये असतानाच त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत.
सध्या हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1077 वर पोहोचली असून त्यातील 750 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 9 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 13 रुग्ण प्रदेशातून बाहेर गेले आहेत.









