ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात आज मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये अंशकालीन मल्टी टास्क वर्कर्स ठेवण्यासाठी एक नियोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या अंतर्गत 7852 बेरोजगारांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून दिली जाईल. या कार्यकर्त्यांना अकादमीद्वारे वर्षातील 10 महिने 6 तास काम करण्यासाठी प्रत्येक दिवसाचे प्रत्येक तासाचे 31.25 रुपये दिले जाणार आहेत. तसेच या बैठकीत प्राथमिक आणि उच्च शिक्षण विभागात काम करणाऱ्या अंशकालीन जलवाहकांच्या वेतनात 300 रुपये वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे यांना आता 2400 रुपयांऐवजी 2700 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील.
25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या आणीबाणीच्या काळात लोकतंत्र सुरक्षा आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांसाठी आंतरिक सुरक्षा व्यवस्था आणि अधिनियम आणि डिफेन्स ऑफ इंडिया रुल नुसार 15 दिवसांपर्यंत कैद्येत असणाऱ्यांना 8 हजार रुपये प्रति महिना तर 15 पेक्षा जास्त दिवस कैदेत असणाऱ्यांना 12 हजार रुपये प्रति महिना लोकतंत्र सन्मान राशी म्हणून दिले जाणार आहेत.