ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील वन विभागाच्या प्रमुख मुख्य आरण्यपाल पदी (पीसीसीएफ) सविता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

सविता शर्मा या प्रदेशातील पहिल्या महिला हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स झाल्या असून मुख्य सचिव अनिल कुमार खाची यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता शर्मा या 1985 च्या बॅचमधील अधिकारी आहेत. सविता या वर्तमानातील पीसीसीएफ हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स अजय कुमार यांच्या पत्नी असून सध्या त्या पीसीसीएफ वन्यजीव म्हणून कार्यरत आहेत. अजय कुमार सोमवारी निवृत्त झाले.









