ऑनलाईन टीम / चंबा :
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंबा टीसा रोडवर एक कार एका खोल दरीत पडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मात्र, नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.









