ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात पंचायत राज संस्थांच्या निवडणुका डिसेंबर 2020 पासून सुरु होणार आणि 22 जानेवारी 2021 पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पंचायती राज मंत्री वीरेंद्र कंवर यांनी सांगितले की, हिमाचलमध्ये पंचायती राज संस्थांच्या निवडणुकीत जागांचे आरक्षण वर्ष 2011 च्या जनगणनेच्या आधारे ठरवल्या जातील. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी तयारी वेळेत पूर्ण केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









