दोन दिवस पाणीपुरवठय़ात व्यत्यय
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी चोवीसतास पाणीपुरवठा योजनेसह शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे एलऍण्डटी कंपनीने कळविले आहे.
हिडकल आणि राकसकोप जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पण हिडकल जलवाहिनीवर ताण पडल्याने जलवाहिनीला कुंदरगीनजीक तसेच ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे दि. 8 व 9 असे दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह शहराचे पाणी दोन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलऍण्डटी कंपनीने केले आहे.









