ऑनलाईन टीम / मॉस्को :
किरगीझस्तानमध्ये मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकांचे प्राथमिक कल हाती आल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण झाली आहे. रस्त्यावर उतरलेल्या विरोधकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांचे निकाल रद्द केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त नूरजहां शैलदाबेकोव्हा यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली.
सत्तारुढ पक्षाशी संबंधित दोन पक्षांनी मते विकत घेऊन निवडणुकांच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप करत विरोधक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला असून, काल रात्रीपासून आंदोलनकर्त्यांनी सरकारी इमारतींचा ताबा घेतला गेला आहे.
विरोधकांनी निवडणुकांचे निकाल रद्द करण्याची आणि देशात नव्याने निवडणुका घेण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने निवडणुकांचे निकाल रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.









