ममता बॅनर्जींचे भाजपला आव्हान : तुरुंगातूनही पक्षाला विजयी करणार
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील बांकुडा येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ‘असत्याचा ढिग’ म्हटले आहे. भाजपमध्ये हिंमत असल्यास मला अटक करून दाखवावी. आगामी निवडणुकीत आपण तुरुंगातूनही तृणमूल काँग्रेसला मिळवून देऊ असे उद्गार त्यांनी काढले आहेत. 294 सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभेसाठी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होणार आहे.
मागील काही काळापासून भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात वाप्युद्ध सुरू आहे. काही लोक सट्टेबाजाप्रमाणे काम करत असून त्यांना भाजप सत्तेवर येण्याचा भ्रम आहे. भाजप राजकीय पक्ष नसून असत्याचा ढिग आहे. निवडणूक नजीक येताच तृणमूल नेत्यांना घाबरविण्यासाठी नारदा आणि शारदा घोटाळय़ाचा मुद्दा पुढे करतात, परंतु मी भाजप आणि त्याच्या यंत्रणांना घाबरत नसल्याचे ममतांनी म्हटले आहे.
राजद नेते लालूप्रसाद यादव यांनाही तुरुंगात डांबण्यात आले, परंतु बिहारमध्ये त्यांनी स्वतःच्या पक्षाचा चांगला विजय साकारला आहे. बिहारमध्ये भाजपचा विजय हा ‘जोड-तोड’ राजकारणाचा परिणाम आहे, हे जनमत नसल्याचा दावा ममतांनी केला आहे.
भाजपला कदापिही संधी नाही
भाजप सत्तेवर येईल अश भ्रमात काही जण आहेत, परंतु भाजपकडे सत्तेवर येण्याची दुरान्वयेही संधी नाही असे या लोकांना स्पष्टपणे सांगू इच्छिते. तृणमूल काँग्रेस पुन्हा मोठय़ा बहुमतासह सत्तेवर येणार असल्याचे ममतांनी म्हटले आहे. राज्यात 2011 पासूनच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे.
शुक्रयान मोहिमेत सामील होणार स्वीडन
नवी दिल्ली : भारताच्या व्हिनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच ‘शुक्रयान’मध्ये स्वीडनची भागीदारी निश्चित झाली आहे. स्वीडिश इन्स्टीटय़ूट ऑफ स्पेस फिजिक्स या मोहिमेत सामील असल्याची माहिती भारतातील स्वीडनचे राजदूत क्लास मोलिन यांनी दिली आहे. जून 2023 मध्ये शुक्र ग्रहाकरता पहिली मोहीम साकारण्याची इस्रोची योजना होती, परंतु महामारीमुळे याची मुदत वाढविण्यात आली आहे. शुक्रयान आता 2024 किंवा 2026 मध्ये प्रक्षेपित केले जाऊ शकते. या ग्रहाकरता अंतराळयान प्रक्षेपित करण्याची सर्वोत्तम संधी दर 19 महिन्यांनी उपलब्ध होते, तेव्हा शुक्र ग्रह पृथ्वीच्या सर्वात नजीक आलेला असतो.