प्रतिनिधी /बेळगाव
बांगलादेश येथे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. या कृतीबद्दल संपूर्ण देशभर निषेध केला जात असून, असे प्रकार पुन्हा घडल्यास भारत सरकारने बांगलादेश विरोधात कठोर भूमिका घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी हिंदू जनजागरण समितीने आंदोलन केले.
धर्मवीर संभाजी चौक येथे हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱयांनी बांगलादेश सरकारचा निषेध केला. बांगलादेश येथे भक्तीचा प्रसार करणाऱया ईस्कॉन मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे तेथील हिंदूधर्मिय अडचणीत असून बांगलादेश सरकारने हे प्रकार थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा भारत सरकारने बांगलादेशला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी सुधीर हेरेकर, वेंकटेश शिंदे, उमेश नायर, संदीप भिडे, अमित नाईक, ईस्कॉनचे नागेंद्र दास राजनारायण दास, संदीप रेनके, सदानंद मासेकर, मारुती सुतार यांच्यासह हिंदू जनजागरण समिती, हमारा देश व ईस्कॉनचे सदस्य उपस्थित होते.









