प्रतिनिधी / कोल्हापूर
समस्त हिंदूत्ववादी संघटनांनी महापालिका निवडणुकीला स्वतंत्रपणे समोरे जाण्याचा निर्धार केला आहे. मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता कार्यालयात झालेल्या बैठकीत सुमारे 25 संघटनांच्या पदाधिकाऱयांनी एकमताने हा निर्णय घेतला. सहा प्रभागातील उमेदवारही निश्चत झाले आहेत. या उमेदवारांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे संभाजी साळुंखे यांनी सांगितले.
हिंदू एकता कार्यालयात हिंदू महासभा, हिंदू एकता, बजरंग दल, सेवाव्रत, पतीत पावन, वंदे मातरम् यासह अन्य 25 संघटनांच्या पदाधिकाऱयांची महापालिका निवडणुक संदर्भात बैठक झाली. बैठकीमध्ये समस्त हिंदूत्ववादी संघटना यापुर्वी भाजप, शिवसेना या हिंदूत्व विचारसरणीच्या पक्षांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जात होत्या. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेनेसोबत न जाता निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्यावर पदाधिकाऱयांचे बैठकीत एकमत झाले. संघटनांच्या पदाधिकाऱयांकडून लवकर महापालिका निवडणुक संदर्भातील भुमिका जाहीर केली जाणार आहे.
बैठकीला संभाजी साळुंखे, संजय साडविलकर, मनोहर सोरप, संजय कुलकर्णी, राजेद्र शिंदे, हिंदूराव शेळके, दीपाली खाडे, रेखा दुधाणे, निलांगी पाटील, गीता रेवणकर, नंदकुमार घोरपडे, बबन हरणे, विलास मोहिते, अवधूत भाटÎे, सुनील पाटील आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









