नवी दिल्ली
जगातील दिग्गज कंझ्युमर कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या भारतीय सहयोगी कंपनीने शेअर बाजारात मजबूत कामगिरी केली आहे. परंतु आर्थिक सुधारणेची स्थिती बदलत असताना कंपनी दुसऱया बाजूला आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे. महागाईसंबंधीच्या कारणास्तव कंपनी चिंता व्यक्त करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचा सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा हा 9 टक्क्यांनी वधारुन तो 2190 कोटी रुपयावर पोहोचला आहे. ब्लूमबर्गकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजामधून हिंदुस्थान युनिलिव्हरचा निव्वळ नफा 2200 कोटीवर पोहोचणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.









