मुंबई
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने एप्रिल ते जून 2020 या तिमाहीच्या काळात 5.7 टक्के इतका निव्वळ नफा मिळवला आहे. कंपनीचा नफा 1 हजार 795 कोटी रुपयांवर पोहचला असून विक्री 3 टक्के वाढीसह 10 हजार 570 कोटी रुपयांवर पोहचली असल्याचे सांगण्यात येते. मागच्या वर्षी याच कालावधीत विक्री 10 हजार 197 कोटी रुपये होती. कंपनीची उलाढाल 4 टक्के वाढली असल्याचे सांगण्यात येते.









