नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीअखेर 8.58 टक्के इतका वाढीव एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. 30 सप्टेंबर 2020 अखेर कंपनीला 1 हजार 974 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी कंपनीने जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत 1 हजार 818 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तिमाहीत कंपनीची विक्री ही 11 हजार 510 कोटी रुपयांची राहिली आहे जी मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 15 टक्के अधिक असल्याचे सांगण्यात आले. मागच्या वर्षी विक्री 9 हजार 931 कोटी रुपयांची होती.









