अज्ञातांचा दहशत माजविण्याचा प्रयत्न, टिळकवाडी पोलिसांकडून तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
हिंदवाडी येथील एका अपार्टमेंटखाली उभी करण्यात आलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून दगडफेकीत कारच्या काचा फुटल्या आहेत.
आशिष अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली आहे. आनंद मारुती मांगले यांच्या केए 22 एमए 6341 क्रमांकाच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी हे कृत्य केले असून त्यांनी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर टिळकवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
समाजकंटकांची
छबी सीसीटीव्हीत कैद
कारच्या काचा फोडणाऱया समाजकंटकांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दगडफेक करुन दहशत माजविणाऱयांच्या मुसक्मया आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.









