वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 16 मार्च ते 20 मार्च अशी मोठय़ा उत्साहात पार पडली. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीने बहुमोल परिश्रम घेतले. याची दखल घेत हिंडलगा येथील ज्ये÷ नागरिक व मुंबईतील उद्योजक हिरामणी रामा कंग्राळकर व कुटुंबीयांनी कमिटीचा गौरव केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामणी कंग्राळकर होते.
प्रारंभी रमेश कंग्राळकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. वास्तुतज्ञ सारिका कंग्राळकर यांनी कमिटीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि न भूतो न भविष्यती असा हा उत्सव आयुष्यामध्ये आम्हास पाहावयास मिळाला. त्यानिमित्त आम्ही कंग्राळकर कुटुंबीयांनी कमिटीचा गौरव समारंभ आयोजित केल्याचे सांगितले. यात्रा उत्सव कमिटीचे सेपेटरी प्रकाश बेळगुंदकर, खजिनदार उदय नाईक यांनी आपल्या भाषणात देणगीदार, गावातील समस्त नागरिक, युवावर्ग व लहानांपासून थोरांपर्यंत ज्यांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना धन्यवाद दिले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पावशे, मार्गदर्शक रमाकांत पावशे यांनी दोन वर्षांमध्ये यात्रा भरण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी कृष्णा पावशे, रमाकांत पावशे, प्रकाश बेळगुंदकर, उदय नाईक, राजू कुपेकर, श्रीकांत जाधव, परशुराम कुडचीकर, भरमा कुडचीकर, विशाल पाटील, सुरेश नाईक, महादेव बेळगुंदकर, ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, सदस्या चेतना अगसगेकर, अनिल पावशे, तुकाराम फडके, मदन कोकितकर, अशोक घाडगे, गजानन जगताप यांचा कंग्राळकर कुटुंबीयांतील सदस्यांच्या हस्ते चांदीचे नाणे, शाल, श्रीफळ व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.









