वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील ग्राम पंचायत सदस्यांच्यावतीने बुधवारी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱया कोरोनायोद्धय़ांचा सत्कार करण्यात आला.
सध्या सर्वत्र कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना तसेच गावातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाचे वैद्यकीय अधिकारी, नर्स, आशा कार्यकर्त्या, पीडीओ, सेक्रेटरी, सर्व कर्मचारी व गावामध्ये सेवारत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांचा स्टिमर, सॅनिटायझर स्प्रे व मास्क आदी साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
वर्गणी काढून मदत
गावातील गरीब कोरोना रुग्णांनाही सदर साहित्य देऊन मदत करण्यात आली. यासाठी सदस्यांनी स्वखर्चातून वर्गणी काढून मदत केली. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
सदस्य डी. बी. पाटील व पीडीओ गंगाधर यांनी कोरोनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व सदस्यांनी कोविड व्हॅक्सिन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची विनंती अधिकाऱयांना केली. यावेळी ग्रा. पं. सदस्या चेतना अगसगेकर, उमा सोणवडेकर, प्रेरणा मिरजकर, ज्योती घाटगे, रेणुका भातकांडे, कित्तूर, सदस्य प्रवीण पाटील, रामचंद्र कुद्रेमनीकर, अशोक कांबळे, डी. बी. पाटील, गजानन बांद्रेकर, राहुल उरणकर, यल्लाप्पा काकतकर, विठ्ठल देसाई, विनायक पावशे, जयवंत साळुंके, वीणा मादार यांच्यासह सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.









