वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथे नुकताच पदग्रहण केलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी गावच्या विकासाला चालना दिली असून मंगळवार दि. 9 पासून प्रत्यक्ष विकासकामांना चालना देऊन आपल्या आश्वासन पूर्तीला सुरुवात केली आहे. नियोजित ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री लक्ष्मी गदगेसमोरील जागेवर पेव्हर्स बसविण्याच्या कामापासून नूतन सदस्यांनी आपल्या कामाचा श्रीगणेश केला आहे.
तब्बल शंभर वर्षांनंतर होत असलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवासाठी लक्ष्मीदेवी यात्रोत्सव संघातर्फे जोरदार तयारी सुरू आहे. यानिमित्त यात्रा भरवण्याच्या ठिकाणी गदगेसमोर सर्व सुविधा पुरविणे गरजेचे आहे. याबाबत माहिती मिळताच नूतन ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर व सदस्यांनी सर्वप्रथम पंचायतीला शासनाकडून मिळालेल्या अतिरिक्त विकास निधीतून यात्रा भरवण्याच्या ठिकाणी पेव्हर्स बसवून परिसराचा कायापालट करण्याचे ठरविण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर होते.
प्रारंभी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवी चौथऱयाचे पूजन झाले. जेसीबी पूजन श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांनी केले. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी यात्रोत्सव संघाचे रमाकांत पावशे, राजू कुप्पेकर, प्रकाश बेळगुंदकर, रविकुमार कोकितकर, सदस्य एन. एस. पाटील, मिथून उसूलकर, अशोक कांबळे, लता उसूलकर, स्नेहल कोलेकर, सुमन राजगोळकर, रेणू गावडे, आरती कडोलकर, सीमा देवकर, देवस्की पंच कमिटीचे मोहन पावशे, यल्लाप्पा सरप यांच्यासह कंत्राटदार संतोष पाटील, यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









