ऑनलाईन टीम / मुंबई :
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या चेहऱयाची सूज उतरली आहे. तिचे डोळेही उघडले आहेत. तिला सर्वकाही दिसत आहे. मात्र, वाचा गेल्यामुळे ती बोलू शकत नाही. आज तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पीडितेवर आज होणारी शस्त्रक्रिया उद्या करण्यात येणार आहे.
एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे या तरुणाने पीडितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तरुणी मोठय़ा प्रमाणात भाजली गेली. तिची प्रकृती सध्या नाजूक असून, ऑरेंज सिटी रुग्णालयात तिचावर उपचार सुरू आहेत. आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.









