पुणे \ ऑनलाईन टीम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. मी याबाबत गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय, लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कोणाला धमकी देत नाही, पण हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. एक एक नाव समोर येईल. लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करावी. त्याबाबत मी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय.
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








