प्रतिनिधी/कोल्हापूर
पालकमंत्र्यांच्या हट्टामुळेच शाहूवाडी तालुक्यातील ठराव धारकाचा बळी गेल्याचा आरोप माजी खासदार, भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी केला आहे. गोकुळ निवडणूक होण्यासाठी पालकमंत्र्यांनी काही संस्था न्यायालयात पाठवल्या. कोल्हापूरात कोरोना परिस्थिती कमी आहे, तसेच काळजी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडू असा हट्ट केला आणि राज्य सरकारची दिशाभूल केली असल्याचीही आरोप यावेळी महाडिक यांनी केला. शाहूवाडी तालुक्यातील सुभाष पाटील या ठराव धारकाचा कोरोनाने बळी घेतला या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती वाढली तर राज्य सरकारने तसे नमूद केल्यास गोकुळ निवडणुकीला स्थगिती देऊ असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र पालकमंत्री यांनी कोल्हापुरात कोरोना परिस्थिती कमी आहे, तसेच काळजी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडू असा हट्ट केला आज एक ठराव धारकाचा मृत्यू झाला हे दुर्दैव आहे.
हा कोरोनाचा मृत्यू नव्हे तर पालकमंत्री यांच्या हट्टाचा बळी आहे. ५० उमेदवार हे ठराव धारकांना भेटत असतात, काळजी घेणे महत्वाचे आहे. निवडणूक आज नाहीतर उद्या होईल राज्य सरकारने ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३१ ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे. गोकुळसाठी पालकमंत्री यांचा हट्ट का? सध्या गोकुळचे ५० ठराव धारक बाधित आहेत त्यामुळे या निवडणुकीत मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. असे महाडिक यांनी म्हटले आहे.
Previous Articleचंद्र आणि मंगळाची आज पिधानयुती
Next Article उत्तर खटाव, पुसेगाव भागात लसीकरणाला ब्रेक









