इंदौर, आग्रा बटाटा व कांदा दर स्थिर : भाजीपाला दरात किंचित वाढ
वार्ताहर /अगसगे
बेळगाव एपीएमसीमध्ये बुधवारच्या बाजारात हासन बटाटय़ाचा भाव प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वधारला आहे तर इंदौर, आग्रा बटाटा व कांद्याचा भाव मात्र स्थिर आहे. भाजीपाल्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव मार्केट यार्डमध्ये हासन बटाटा विक्रीसाठी येत आहे. काढणीला वेग आल्याने गोवा व बेळगाव येथून मागणीला जोर आला आहे. काळय़ा जमिनीतील बटाटय़ाला गोवा राज्यामध्ये तर लाल जमिनीतील बटाटय़ाला बेळगाव भागामध्ये अधिक मागणी असल्याने लाल बटाटय़ाचा भाव प्रतिक्विंटल 600 ते 2500 रुपये, काळय़ा जमिनीतील बटाटय़ाचा भाव प्रतिक्विंटल 200 ते 2000 रुपये झाला आहे. इंदौर बटाटा केवळ तीन ट्रक तर आग्रा येथून एक ट्रक बटाटा बुधवारी विक्रीसाठी दाखल झाला होता.
महाराष्ट्रातून 31 ट्रक व कर्नाटकातून 4 ट्रक असे एकूण 35 ट्रक कांदा आवक होती.
भाजीपाल्याच्या दरात वाढ
भाजीपाल्याच्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून काही भाजीपाल्याचे दर घसरले होते. मात्र, आता परराज्यातून विक्रीसाठी येणारी भाजीची आवक कमी झाल्याने प्रति 10 किलो भाजीपाला दरात शंभर, दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.
कांदा प्रतिक्विंटल
- गोळी 800 ते 1500 रु.
- मीडियम 1500 ते 2000 रु.
- मोठवड 2000 ते 2100 रु.
- गोळा 2100 ते 2300 रु.
- हासन पांढरा बटाटा प्रतिक्विंटल
- गोळी 200 ते 500 रु.
- मीडियम 800 ते 1800 रु.
- गोळा 1800 ते 2000 रु.
हासन पांढरा बटाटा
- गोळी 500 ते 1200 रु.
- मीडियम 1200 ते 2000 रु.
- गोळा 2000 ते 2500 रु.
- आग्रा 1300 ते 1500 रु.
- इंदौर 1300 ते 1500 रु.
- भाज्यांचे भाव प्रति दहा किलो
- कोबी 50 ते 80 रु.
- बिन्स 250 ते 350 रु.
- गवार 180 ते 280 रु.
- भेंडी 150 ते 200 रु.
- मटार 600 ते 800 रु.
- बीट 150 ते 200 रु.
- वांगी 200 ते 300 रु.
- ढबू मिरची 80 ते 120 रु.
- कारली 100 ते 150 रु.
- इंग्लिश गाजर 200 ते 350 रु.
- टोमॅटो टे 200 ते 300 रु.
भाजीपाला शेकडा
- मेथी 800 ते 1200 रु.
- शेपू 300 ते 500 रु.
- लाल भाजी 400 ते 500 रु.
- पालक 250 ते 400 रु.
- कोथिंबिर 400 ते 800 रु.
- कांदापात 300 ते 400 रु









