प्रतिनिधी/ चिकोडी
चिकोडी-संकेश्वर राज्य महामार्गावर हालट्टीनजीक वळत असलेल्या ट्रक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात करोशीचा दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. यमनाप्पा भरमाप्पा चौडन्नवर (वय 60) असे मृताचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, यमनाप्पा चिकोडीतील आपले काम संपवून दुचाकीवरून करोशीकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणारा प्रल्हाद जुगळे (रा. बन्यानकोडी, चिकोडी) यांचा ट्रक्टर हेस्कॉमच्या जागृती दल कार्यालयाच्या दिशेने वळला. समोरून येणाऱया यमनाप्पाच्या दुचाकीची ट्रक्टरला जोराची धडक बसली. त्यात यमनाप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना ताडीने 108 रुग्णवाहिकेतून चिकोडीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.









