वार्ताहर/ हलगा
हलग्याजवळील सर्व्हिस रस्त्यावर पडलेल्या एका निराधार व्यक्तीला तातडीची मदत करून पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून हा इसम येथे पडून होता.
रस्त्याकडेला पडल्यामुळे हलगा ग्राम पंचायत सदस्य सुनील कालिंग व प्रकाश लोहार यांनी ही माहिती फूड फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर व बागेवाडी पोलीस ठाण्याला कळविली. यावेळी रुग्णवाहिकेला पाचारण करून संबंधित व्यक्तीला अधिक उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. तत्पूर्वी या इसमाला खायला देण्यात आले. परंतु, तो अशक्त असल्यामुळे जमिनीवरच पडून होता. तसेच त्याच्या पायालाही जखमा झाल्या होत्या. यावेळी त्याच्याशी विचारणा करण्यात आली. यावेळी तो गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील असल्याचे सांगितले. लॉकडाऊनच्या काळात त्याच्यावर ही परिस्थिती ओढविली असल्याचे कळते. यावेळी बागेवाडी पोलीस ठाण्याचे एएसआय गोणी, ग्रा. पं. सदस्य सुनील कालिंग, प्रकाश लोहार, सौरभ घोरपडे, सुरेंद्र अनगोळकर व ग्रामस्थ उपस्थित होते..









