प्रतिनिधी / बेळगाव
हालगा येथील जे. आर. डी. हायस्कूलमध्ये नुकताच तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्यावतीने तालुक्मयातील चित्रकला शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. तालुका गटशिक्षणाधिकारी आर. पी. जुट्टण्णावर, शिक्षण संयोजक मेदार यांच्या हस्ते रोपटय़ांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी डायट चित्रकला अधिकारी दिलीप काळे, मुख्याध्यापक जनगौडा, तालुका चित्रकला शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत कांबळे उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्प व भेटवस्तू देवून स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱयांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने भारताचा नकाशा व विज्ञानमधील आकृत्या कशा पद्धतीने रेखाटाव्या यासंदर्भात मार्गदर्शन केले. चित्रकला शिक्षकांनी चित्रकलेबरोबर अभ्यासक्रमातील आकृत्या काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यावा, असे ही सांगितले.
दुपारच्या सत्रात भारताचा नकाशा आणि विज्ञानमधील आकृत्या कशा पद्धतीने काढाव्यात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ज्ञानेश्वर मिराशी, गजानन लोहार, गजानन गुंजीकर व वसंत कांबळे यांनी प्रात्यक्षिके दाखवून माहिती दिली.
तालुका चित्रकला संघटनेचे कार्यदर्शी बी. बी. कमती यांनी आभार मानले. याप्रसंगी चित्रकला शिक्षक उपस्थित होते.









