हरयाणातील कारखाना बंद, दुसऱया कंपनीशी भागीदारी शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील मोटारसायकल निर्मिती कंपनी हार्ले डेव्हिडसनने अखेर भारतातील निर्मिती कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दमदार मोटारसायकलच्या विश्वात हार्ले डेव्हिडसनने चांगले नाव कमावले असून भारतीयांचीही या गाडीला पसंती मिळत असते. गाशा गुंडाळण्याबाबत गेल्या महिन्याभरातच हालचाली सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. कंपनी बावल, हरियाणा येथील आपला कारखाना बंद करणार असून गुरगाव येथील विक्री कार्यालयाचा आकारही कमी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हार्ले डेव्हिडसनने भारतात आपली सेवा कायम राहणार असल्याचे सांगत भारतात विक्री केंद्राच्या माध्यमातून यापुढेही ग्राहकांना सेवा दिली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. पुढच्या काळात व्यवसाय धोरणात आवश्यक ते बदल मात्र करावे लागणार आहेत. दरवषी कंपनीकडून 17 दशलक्ष इतक्मया गाडय़ांची विक्री होते. येणाऱया काळात कंपनी व्यवसायासाठी भारतात एखाद्या कंपनीशी भागीदारी करू शकते.









