लसीकरणासाठी गर्दी वाढल्यास खासगी हॉस्पिटल्सची संख्या वाढणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. बुधवारी लसीकरणासाठी शहरातील केंद्रांवर गर्दी झाली. सीपीआर, सेवा रूग्णालयात ज्येष्ठ नागरीक, त्यातही लस घेण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या अधिक होती. दरम्यान, जिल्ह्यातील 120 केंद्रांवर हायरिस्क फॅक्टरसाठी मोफत लसीची सुविधा आहे. यामध्ये 75 आरोग्य केंद्रे, 21 उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये, 8 नागरी केंद्रे आणि 16 खासगी हॉस्पिटल्सचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधक त्रिसुत्रींचे पालन करत लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात 60 वर्षावरील व 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड रूग्णांसाठी लस दिली जात आहे. जिल्ह्यातील 75 ग्रामीण आरोग्य केंद्रांत लस उपलब्ध आहे. यामध्ये आजरा 4, भुदरगड 5, चंदगड 6, गडहिंग्लज 6, गगनबावडा 2, हातकणंगले 9, करवीर 9, पन्हाळा 6, राधानगरी 6 कागल 5, शिरोळ 8 व शाहूवाडी तालुक्यातील 9 केंद्रांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आरोग्य केंद्रे :
आजरा – भादवण, मलिग्रे, उत्तूर, वाटंगी,
भुदरगड – कडगाव बुद्रुक, मडिलगे, मिणचे खुर्द, पाटगाव, पिंपळगाव,
चंदगड – अडकूर, हेरे, कानूर, कोवाड, माणगाव, तुडीये,
गडहिंग्लज – हलकर्णी, कडगाव, कानडेवाडी, महागाव, मुगुंरवाडी, नूल,
गगनबावडा – गारीवडे, निवडे,
हातकणंगले – अंबप, आळते, भादोले, हेर्ले, हुपरी, पट्टणकोडोली, पुलाची शिरोली,
करवीर – भुये, हासूर, इस्पुर्ली, कणेरी, मुडशिंगी, सांगरूळ, शिरोली दुमाला, उचगाव, वडणगे,
पन्हाळा – बाजार भोगाव, बोरपाडळे, कळे, केखले पोखले, वारणा कोडोली, पडळ,
राधानगरी – धामोड, राशिवडे, सरवडे, तारळे, ठिकपुर्ली, वाळवे,
शाहूवाडी – आंबा, बांबवडे, भेडसगाव, करंजफेण, माण, मांजरी, परळी निनाई, शित्तूर, सरूड, साजणी, सावर्डे,
कागल – चिखली, सेनापती कापशी, पिंपळगाव, कसबा सांगाव, सिद्धनेर्ली,
शिरोळ – अब्दुललाट, दानोळी घालवाड, जयसिंगपूर, नांदणी, नृसिंहवाडी, सैनिक टाकळी, जयसिंगपूर.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 21 उपजिल्हा, सेवा, ग्रामीण रूग्णालयात लस देण्यात येत आहे. यामध्ये आजरा, गारगोटी, चंदगड, नेसरी, गगनबावडा, पारगाव, हातकणंगले, कागल, मुरगुड, खुपिरे, पन्हाळा, राधानगरी, सोळांकुर, मलकापूर, शिरोळ, दत्तवाड अशा 16 ग्रामीण रूग्णालयांत, तसेच गडहिंग्लज, गांधीनगर आणि वारणा कोडोली या 3 उपजिल्हा रूग्णालयांत व कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयात लस देण्यात येत आहे.
कोल्हापूर शहरात सीपीआर हॉस्पिटल व्यक्तिरिक्त महापालिकेच्या 7 नागरी केंद्रांत लसीकरण सुरू आहे. यामध्ये सिद्धार्थनगर, राजारामपुरी, महाडीक माळ, फिरंगाई गल्ली शिवाजी पेठ, सदर बाजार, पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 15 खासगी हॉस्पिटलमध्ये 250 रूपयांत लस उपलब्ध आहे. यामध्ये गडहिंग्लजला देसाई हॉस्पिटल, संत गजानन महाराज हॉस्पिटल, पेठवडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटल, हेर्ले येथील हृदया हॉस्पिटल, इचलकरंजी येथील अलायंन्स हॉस्पिटल, कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल, उजळाईवाडी येथील अथायू हॉस्पिटल, वारणा कोडोली येथील यशवंत धर्मादाय हॉस्पिटल, बोरपाडळे येथील संजिवनी हॉस्पिटल, कोल्हापूर शहरातील शतायू, केपीसी, ऍपल, डायमंड, सिद्धीविनायक आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये लस देण्यात येत आहे.









